मित्रानेच केला मित्राचा घात एकाचा जन्मदिवस ठरला दुसऱ्याच्या मृत्यूची काळी रात...

 


मित्राच्या वाढदिवसाला आलेल्या तरुणाचे अपहरण करून हत्याराने वार करून खून केल्याचा प्रकार सिम्बायोसिस कॉलेज रस्ता नांदेगाव येथे घडला.
आदित्य खोत (वय 25, रा. पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आदित्य याला त्याच्या मित्रांनी वाढदिवसाचा केक कापण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. पिंपरीतील सुभाषनगर येथे सर्वजण जमले होते. त्यांनी आदित्यला नांदेगाव येथे नेले आणि त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला.
याबतबत त्याच्या आईने गुरुवारी पिंपरी पोलीस ठाण्यात आदित्य बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यावेळी पोलिसांनी त्याला फोन केला असता मित्रांसोबत असल्याचे त्याने आईला सांगितले होते.
ही घटना शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास समोर आली.

Review