_1.jpg)
पावसाळ्याची काळजी
पावसाळ्यात आहाराची योग्य ती काळजी घेतली नाही तर काही विशिष्ट आजार उद्भवलेच म्हणून समजा. ते टाळण्यासाठी पावसाळ्यात आपला आहार कसा असायला हवा, याची माहिती घेऊ या.पावसाळ्यात आहाराची योग्य ती काळजी घेतली नाही तर काही विशिष्ट आजार उद्भवलेच म्हणून समजा. ते टाळण्यासाठी पावसाळ्यात आपला आहार कसा असायला हवा, याची माहिती घेऊ
निरोगी आरोग्यासाठी काही पथ्ये काटेकोरपणे पाळावी लागतात. लहान मुलांना तर या सर्दी-तापाची लागण जलद होत असते. त्यांची पचनसंस्था नाजूक असल्याने कोणत्याही आजाराची अर्थात ताप, खोकला, कांजिण्या, गोवर, अतिसार यांची बाधा हटकून होते. शरीरातील पाणी जलद कमी होत जाते व वेळीच वैद्यकीय उपचार व्हायला पाहिजेत. अगदी प्रौढांनासुद्धा कॉलरा, अतिसार, मलेरिया, स्वाइन फ्लूचे आजार होऊन प्रकृती गंभीर बनते. म्हणून पावसाळा आला की अनेकांचे आरोग्य बिघडते.
निदान पावसाळ्यात तरी रस्त्यावरील स्टॉलवर खाणे टाळल्यास संभाव्य आजारांपासून आपण दूर राहू शकतो. कारण, पावसाळ्यात आजार पसरण्याची जास्त शक्यता असते. या खाण्यामधून बाधा होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे उघड्यावरचे खाताना तेथील स्वच्छता लक्षात घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात. पावसाळ्यात पाणी शक्यतो उकळून प्यायलेले योग्य असते. उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळले तर जंतुसंसर्ग होण्याची जोखीमही कमी होते.
पावसात चिंब भिजून उघडय़ावर विकले जाणारे वडे, सामोसे व भजी खाताना मज्जा येते खरी, पण काही वेळा त्यामुळे होण्याऱ्या गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. कावीळ (jaundice), विषमज्वर (typhoid), अतिसार (diarrhoe), संग्रहणी (dysentery) यांसारखे काही आजार पावसाळ्यात खूप प्रमाणात पसरतात.हेपाटाइटीस-एपावसाळ्यात हेपाटाइटीस-ए या रोगाचा संसर्ग सहज होऊ शकतो. या आजारात यकृत म्हणजेच लिव्हर (liver) या शरीरातील अतिशय महत्त्वाच्या अवयवाच्या कार्यात बिघाड होतो. नक्की काय होऊ शकते हे समजून घेण्यापूर्वी आपण यकृताचे शरीरातले काम काय याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात वातावरणात अनेक बदल होत असतात. ग्रीष्माची कोरडी हवा जाऊन हवेत आर्द्रता आणि थंडावा वाढतो. सततच्या पावसामुळे आजूबाजूला सर्वत्र पाणी साचून राहते. अशा पाण्यामुळे काही विशिष्ट आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. अशा वेळी सर्दी, डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, स्वाइन फ्लू, हिवताप, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे आजार डोके वर काढत आहेत त्यामुळे योग्य काळजी घेतल्यास या आजारांपासून दूर राहणे शक्य होते, असा सल्ला डॉक्टर वेळोवेळी देत आहेत.
समतोल आहार घेणं पावसाळ्याच्या दिवसांत खूप महत्त्वाचे असते. बाहेरचे जास्त तेलकट-तिखट खाद्यपदार्थ खाणे टाळले पाहिजे. पावसाळ्यात घाम येत नाही त्यामुळे हायड्रेशन होत नाही. यामुळेच हे आजार बळावतात. त्यामुळे जेवढे पिता येईल तेवढे भरपूर पाणी प्यायचे. डेंग्यू, स्वाइन फ्लू, लेप्टो-स्पायरोसिस आणि हिपेटायटीस या रोगांमध्ये तर रुग्णाने भरपूर पाणी पिणं अतिशय गरजेचं आहे.
Read more at http://www.maharashtralive.co.in/article_view?catid=7&id=759#lyiS0LJL2bmM47DL.99