डी. एस. कुलकर्णी दाम्पत्याचा पाय आणखी खोलात

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या डी. एस. कुलकर्णी दाम्पत्याचा पाय आणखी खोलात सापडला आहे. डीएसके समूहाने 52 कोटीचा व्हॅट कर चुकविल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी विक्रीकर निरीक्षक गणेश कुलकर्णी आणि अमोल आहेर यांनी फिर्याद दिली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2006 ते 2009 आणि 2013 ते 2016 या काळात डीएसके डेव्हलपर्स समूहाने अनुक्रमे 39 कोटी 19 लाख 43 हजार 297 रुपये आणि 13 लाख 6 लाख 99 हजार 503  इतका व्हॅट कराची रक्कम जाणिवपूर्वक भरली नाही. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पी.ए.खटके आणि पी.ए.पवार अधिक तपास करीत आहेत.  

Review