रे राया

मिलिंद शिंदे यांचा "रे राया" हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याची कथा आहे यशस्वी धावपटू अजयची(भूषण प्रधान). तो गावातून पुढे आलेला आशयाई पातळीवरचा सुवर्णपदक मिळवलेला खेळाडू आहे. मात्र छत्रपती शिवाजी क्रीडा पुरस्कार न मिळाल्याने तो दुःखाच्या दरीत बुडतो. का? माहीत नाही. तो त्याच्या श्रीमंत आणि अर्थातच सुंदर प्रेयसी स्मितालाही (संस्कृती बालगुडे) काही कळू देत नाही. एरवीही तो तिला ती प्रेयसी असूनही चित्रपटभर हिडीसफिडीस करतो आणि जवळ फिरकू देत नाही.
तो निराश होऊन गावात येतो. तेथे त्याच्या गावात त्याला उंच उडी मारणारा, वस्तू चोरून पाळणारा आणि गोफणीने अचूक आंबे पाडणारा असे तीनजण भेटतात. तो त्यांना प्रशिक्षित करून त्यांना छत्रपती शिवाजी क्रीडा पुरस्कार मिळवून देण्याचा चंग बांधतो, आणि तसे करून दाखवतो असा हा चित्रपट आहे.
मात्र, तसे करणे म्हणजे मोठी संघर्षाची बाब. मात्र हा संघर्ष खूप सोपा करून टाकल्यामुळे यातील नाट्याला असलेला वाव नाहीसा झाला आहे. (सिस्टीमचं काय असे तुम्ही विचारत असाल तर त्यावर निवड समितीपुढे एक भाषण असे उत्तर आहे.)
चित्रपट निर्मितीसाठीची त्यातील स्पर्धासाठीची तयारी आदी मेहनत खूप घेतलेली दिसते. मात्र त्यातील कथाप्रवासाकडे आणि पात्रनिर्मितीकडे दुर्लक्ष झाल्याने ती फलदायक होण्यापासून लांब राहिला आहे.

Review