बर्फावरून घसरत खेळावयाचे खेळ

बर्फावरून घसरत खेळावयाचे खेळ. त्यात स्केटिंग, स्कीइंग, टोबॉगनिंग, बॉब्‌स्लेडिंग, बर्फावरील हॉकी इ. खेळ मोडतात. पर्वतमय बर्फाळ देशांत-उदा., नॉर्वे, ऑस्ट्रिया, स्वीडन, स्वित्झर्लंड, जर्मनी, इटली, फ्रान्स, रशिया, अमेरिका, कॅनडा इ. – हे खेळ लोकप्रिय आहेत. भारतात काश्मीरमध्ये बर्फावरील काही खेळ खेळले जातात

बर्फावरून चालण्यापेक्षा घसरणे अधिक सोपे व जलद असते. यासाठी मानवनिर्मित कृत्रिम साधनांचा वापर फार प्राचीन काळापासून होत आला. उदा., बर्फ-बुटांचा (स्नो शू) आद्य ओबडधोबड प्रकार एस्किमो व नॉर्थ अमेरिकन-इंडियन लोक वापरत असत.‘स्की’ (बर्फावरून घसरण्यासाठी बुटाखाली जोडावयाची सपाट, लांब लाकडी पट्टी) तर सु. ४,०००-५,००० वर्षापूर्वीपासून अस्तिवात असाव्यात. स्कीनंतर ‘स्केट’ चा (बर्फावरून घसरता यावे म्हणून बुटाला 

बर्फावरील हॉकी : एक अटीतटीचे द्दश्यप्राचीन काळापासून बर्फाळ प्रदेशात बर्फावरील शिवाशिवी, बर्फाच्या चेंडूचे खेळ, बर्फाचे किल्ले वा घरे यांसारशे प्राथमिक क्रीडाप्रकार रूढ आहेत. पुढे काही खास तांत्रिक साधने निर्माण होत गेली व बर्फावरून धावण्या-घसरण्याच्या व उड्डाणांच्या स्पर्धा, विविध नृत्यप्रकार, हॉकीसारखे खेळ, विविध प्रकारच्या गाड्यांच्या शर्यती असे अधिक कौशल्यपूर्ण प्रकार स्पर्धात्मक पातळीवर खेळले जाऊ लागले. हे खेळ आता नियमबद्ध व संघटित स्वरूपात खेळले जातात. त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाल्या असून त्यांच्यामार्फत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवल्या जातात.

हे खेळ हिवाळी खेळांच्या (विंटर गेम्स) प्रकारात मोडतात. १९०८ मध्ये फिगर स्केटिंग व १९२० मध्ये बर्फावरील हॉकी या अंतर्गेही (इमडोअर) खेळांचा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्यात आला होता. तथापि ऑलिंपिक क्रीडासामने सामान्यतः उन्हाळ्यातच भरत असल्याने या खेळांना अधिक मोठ्या प्रमाणात वाव देता येणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑलिंपिकचे हिवाळी सत्र १९२४ मध्ये फ्रान्समधील शामॉनी येथे भरवण्यात येऊन, त्यात बर्फावरील विविध स्पर्धात्मक क्रीडाप्रकारांचा अंतर्भाव करण्यात आला. तेव्हापासून झालेल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे स्थळ व वर्ष पुढीलप्रमाणे : सेंट मरिट्स (स्वित्झर्लंड, १९२८), लेक प्लॅसिड (अमेरिका, १९३२), गार्मिश पार्टनकिर्शन (प.जर्मनी, १९३६), सेंट मरिट्स (१९४८), ऑस्लो (नॉर्वे, १९५२), कार्तीना दांपेस्ता (इटली, १९५६), स्व्कॉ व्हॅली (अमेरिका, १९६०), इन्सब्रुक (ऑस्ट्रिया, १९६४), ग्रनॉबल (फ्रान्स, १९६८), साप्पोरो (जपान, १९७२), इन्सब्रुक (१९७६) व लेक प्लॅसिड (१९८०). या स्पर्धांमध्ये सामान्यतः पुढील क्रीडाप्रकारांचा समावेश होतो : (१) आल्पाइन स्कीइंग-ही स्पर्धा डाउनहिल, स्लालोम व जायंट स्लालोम या तीन गटांमध्ये घेतली जाते, (२) बर्फावरील हॉकी, (३) स्की जंपिंग, (४) स्पीड स्केटिंग, (५) टोबॉगनिंग , (६) बॉब्‌स्लेड़िंग, (७) बायथलॉन व (८) फिगर स्केटिंग.

Review