
Blank Name
गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे गोदावरी नदीत सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता. आणि सोमवारी सकाळी 10 वाजता ठिय्या आंदोलन सुरू झाले.या वेळी काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय 26 वर्ष) या तरुणाने दुपारी आरक्षणासाठी घोषणाबाजी करत पाण्यात उडी घेतली. आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या नंतर आंदोलनाने उग्र रूप धारण केले. आणि याचे लोण राज्यभर पसरले.
या पाश्वभूमीवर मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांस सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच काकासाहेब यांच्या भावाला शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरी देण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे. मराठा आंदोलकांनी काकासाहेब यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यानंतर सरकारने ही घोषणा केली.
तसेच काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसिलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस नीरीक्षक सुनिल बिर्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.