पिंपरी-चिंचवडचे नामधारी कारभारी कोण? मंगळवारी कळेल...

महापौर, उपमहापौरपदासाठी मंगळवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज करायचे आहेत. त्यामुळे लगेचच महापौर, उपमहापौर कोण होणार हे स्पष्ट होणार असून प्रत्यक्ष निवडणूक शनिवारी (दि.4 ऑगस्ट) रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी महापौर आणि उपमहापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या मंगळवारी (दि.31) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत महापौर, उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

 

Review