हॉटेलरूममध्ये गोंधळ घालणाऱ्या जमावाकडून पोलिसांना मारहाण,चार व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
हॉटेलमध्ये गोंधळ घालणाऱ्या जमावानेच पोलिसांना मारहाण करण्याचा प्रकार मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास राजे शिवाजीनगर, चिखली येथे घडला असून चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखली येथील हॉटेल राठी येथे रूम ३०५ मध्ये स्पीकर लावून काही तरुण गोंधळ घालत असल्याची माहिती पोलीस कक्षाला मिळाली. यावर निगडी पोलिसाकडून तात्काळ कार्यवाहीसाठी वरे आणि गेंगजे हे पोलीस हॉटेलमध्ये दाखल झाले, आणि गोंधळ घालणाऱ्या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न्न केला पण या वेळी पोलिसांनाच अपशब्द वापरून, गणवेश फाडून, मारहाण करण्यात आली.वरे यांचा फोन तोडण्यात आला.
या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे अशोक ठका वरे यांनी फिर्याद दिली असून इमामुद्दीन तयबअली इनामदार,योगेश माने, महोम्मद सैद तयबअली इनामदार, विकास डाळिंबे यांच्या विरोधात सेक्शन 353,352,332,427,504,३४ या प्रमाणे सरकारी कामात अडथळा, मारहाण, गोंधळ, धमकी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सीता वाघमारे करीत आहेत.