ग्राहकांना आनंदाची बातमी, काही जीवनावश्यक वस्तूंवर gst कपात

अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेने गेल्या आठवडय़ात २८ टक्क्यांच्या सर्वात मोठय़ा करातून अनेक उत्पादनांना मुक्त करून त्यांना १८ टक्के कर स्लॅबमध्ये टाकले.यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार असून याचा सरळ सरळ फायदा ग्राहकांना होणार आहे. सॅनिटरी नॅपकिन, चप्पल, फ्रीज यासह ८८ सर्वोपयोगी वस्तूंचा यामध्ये समावेश आहे. या वस्तूंवरील वस्तू आणि सेवाकरात (जीएसटी) मोठय़ा प्रमाणात कपात करण्यात आली आहे. फ्रीज, वॉशिंग मशीन, लहान स्क्रीनचे टीव्ही, स्टोरेज वॉटर हीटर, पेंट यांच्यावर आजपासून १८ टक्केच जीएसटी लागणार आहे. सॅनिटरी नॅपकिन जीएसटीतून मुक्त केले आहेत. या आधी सॅनिटरी नॅपकिनवर १२ टक्के कर आकारण्यात येत होता. या वस्तू जरी स्वस्त झाल्या असल्या तरीही काही महागही झाल्या आहेत. सरकार टिकाऊ ग्राहक वस्तूंवर आयात शुल्क वाढविण्याच्या गृहउद्योगांच्या मागणीवर लक्ष देत असल्याचे अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाचे प्रमुख (सीबीआयसी) अधिका-याने सांगितले. उद्योग जगतातील संघटनांनी गृहोद्योगांचे सुरक्षा आणि सीमा शुल्क वाढविण्याची मागणी सरकारकडे केली. सरकार नेहमीच्या वापरातील वस्तूंवर आयात शुल्क वाढविण्याच्या विचारात आहे का? असा प्रश्न सीबीआयसीचे चेअरमन एस. रमेश यांना विचारण्यात आला. त्यावेळी घरगुती उद्योगांनी संरक्षणाची गरज व्यक्त केली आहे. आम्ही त्याच प्रस्तावावर लक्ष देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जीएसटी परिषदेने केलेल्या करकपातीनंतर एकूण १५ इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. यामध्ये वरील वस्तूंव्यतिरिक्त व्हॅक्युम क्लीनर्स, लॉण्ड्री मशिन्स, हॅण्ड ड्रायर्स, धान्य ग्राइंडर्स आदी उपकरणांच्या किमती घटणार आहेत. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारख्या वस्तू दैनंदिन वापरामध्ये गणल्या जातात. या वस्तू आयात करताना यावर सीमा शुल्कावर एकीकृत जीएसटी (आयजीएसटी) द्यावा लागतो. जीएसटी दरात कपात केल्यानंतर आयात करणा-यांसाठी आयजीएसटी दरही कमी होणार आहेत. सरकार या वस्तूंवरील आयात कर वाढवू शकते. यामुळे विदेशी कंपन्यांच्या वस्तू महाग होती

Review