अनाथालायतील मुलांचे लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली मौलवीला अटक
पुणे येथील अनाथालायतील मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली तेथील काळजीवाहू मौलवीला पोलिसानी अटक केली आहे. तसेच ३६ मुलांची सुटका केली आहे. आरोपी मौलवीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. २२ वर्षीय आरोपी मौलवी हा मुळचा बिहार येथील रहिवाशी आहे.
पोलिसांनी सांगितले की, अनाथालयात राहणारे बहुतांश मुले हे बिहार येथील आहेत. त्यांच्यातील १० वर्षाचे दोन मुले काही दिवसांपूर्वी त्रस्त होऊन आनाथलायातून पळून गेले होते. त्यानंतर एका एनजीओच्या कार्यकर्त्यांशी त्यांची भेट झाली. त्यांनी मुलांची विचारपूस केली. सुरूवातीला मुलांनी काहीही सांगितले नाही. परंतु, काही दिवसानंतर त्यांनी अनाथलायाविषयी माहिती दिली. यानंतर एनजीओच्या कार्यकर्त्यांनी मुलांना बाल कल्यान समितीसमोर नेले. समितीच्या सदस्यांनी मुलांची विचारपूस केली तेव्हा त्यांनी लैंगिंक शोषण झाल्याची माहिती दिली.
चाइल्ड अॅक्टिविस्ट डॉ. यामिनी अदबे यांनी सांगितले की, सर्व मुलांची आनाथालायातून सुटका करण्यात आली असून त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले आहे. लवकरच, त्यांचे जबाब बाल कल्याण समितीच्या कार्यालयात नोंदवण्यात येईल. यावरून इतर मुलांचे लैंगिक शोषण झाले आहे का याविषयी माहिती समोर येईल.