आंबेनळी घाटात भीषण अपघात, ३३ प्रवासी ठार, केवळ एकच बचावला.
आंबेनळी घाटात भीषण अपघात, ३३ प्रवासी ठार, केवळ एकच बचावला.
आंबेनळी घाटातील 600 फूट खोल दरीत मिनी बस कोसळून भीषण अपघात झाला आहे. घाटातील निसरड्या रस्त्यावरून ही बस दरीत किमान सहाशे फूट खाली गेल्याचे समजते. या दुर्घटनेत 33 प्रवासी ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर सुदैवाने बसमधील एक प्रवासी बचावला.
प्रकाश सावंत-देसाईअसे बचावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील साधारण 34 कर्मचारी महाबळेश्वर येथे विद्यापीठाच्या बसने सहलीला निघाले होते. त्यावेळी पोलादपूर पासून 15 किमी अंतरावर आंबेनळी दरीत बस कोसळली. या दुर्घटनेत बसमधील 33 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एक प्रवासी सुदैवाने बचावला आहे.
सध्या घटनास्थळावर मदत करण्यासाठी पोलादपूर पोलीस स्टेशन येथील संपूर्ण स्टाफ, महसूल विभाग, तसेच महाबळेश्वर येथील बचाव पथक आणि वैद्यकीय पथक हजर झाले आहे. सातारा जिल्ह्यातून रायगड जिल्ह्याकडे जाणाऱ्या बसमधून कृषी विद्यापीठाचे कर्मचारी सहलीसाठी प्रवास करत होते.