पिंपरी-चिंचवड शहर मनसेनेच्या प्रभारीपदी किशोर शिंदे
पिंपरी-चिंचवड शहर मनसेनेच्या प्रभारीपदी पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवड केली आहे.
किशोर शिंदे हे पक्षाचे राज्य सरचिटणीस आहेत. त्याचप्रमाणे पक्षाचे जनसंघटन व प्रचार प्रसाराचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच पिंपरी-चिंचवडच्या प्रभारीपदीही त्यांची निवड करण्यात आली आहे. किशोर शिंदे हे पुणे महापालिकेचे मनसेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांच्या या निवडीचे मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले व इतर पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.