मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाची वाट पाहू नये,लवकरात लवकर आरक्षण दयावे- उद्धव ठाकरे यांची सरकारला मागणी

आजचे सामाजिक वातावरण पाहता, सरकारने मागाससवर्गीय आयोगाची वाट न पाहता मराठा
समाजाला तात्काळ आरक्षण द्या, यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली आहे. याप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले. माझ्या मराठा बांधवांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालचं पाहिजे, त्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहू नये. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, त्यासाठी आज शिवसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही उद्धव यांनी स्पष्ट केले.मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र त्यासाठी सध्या ज्या समाजांना आरक्षण मिळाले आहे, त्यांच्या आरक्षणाला काहीही करू नका. केन्द्राकडे एकदाच सर्व समावेशक असा अहवाल सर्वानुमते पाठवा अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली. माझ्या मराठा बांधवांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालचं पाहिजे, त्यासाठी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट पाहू नये.

Review