मुस्लिमांनाच टार्गेट का ? राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अपना वतनचा सवाल
आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण सर्व जाती -धर्माच्या नागरिकांना घेऊन सर्वांचा आर्थिक ,सामाजिक ,शैक्षणिक विकास केला पाहिजे . परंतु मागील काही वर्षमध्ये देशामध्ये कट्टरवादी द्वेषमूलक संघटना व काही सत्ताधारी लोकप्रतिनिधी मागासवर्गीय - अल्पसंख्याकावर झुंडीच्या स्वरूपात हल्ले करीत आहेत. त्या हल्ल्यांचे समर्थनही जाहीरपणे करीत आहेत.अशा परिस्थिती मध्ये अल्पसंख्यांक समाज प्रचंड दहशतीमध्ये जगात आहे. अशावेळी आपल्याकडून काही ठरविक मंडळींना खुश करण्यासाठी राजकीय वक्तव्य केली जात आहे. पण सुजाण राजकीय व्यक्तींनी तरी अशी वक्तव्य करू न अल्पसंख्यानक का टारगेट केली जातात? असा सवाल आपण वतन संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
मस्जिदला चटई क्षेत्र वाढवून दिले जात नसल्याने तसेच बांधकामास परवानगी दिली जात नसल्याने जागा अपुरी आहे, तशी परवानगी मिळायला हवी. म्हणजे बाकी प्रश्नच निर्माण होणार नाहीत,
आपल्या देशामध्ये सर्व जाती -धर्माचे अनेक सण -उत्सव येतात . लग्नच्या वरातीत , वाढदिवसांच्या कार्यक्रमात , राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात सरसपणे अनेक तास ध्वनिप्रदूषण नियमनाचे उल्लंघन होते.परंतु राजकीय नेत्यांची वेळेनुसार भूमिका बदलत राहते. सर्व समाजाचा विचार करून नेतृत्वने व्यक्त व्हावे हि आमची भारतीय नागरिक म्हणून माफक अपेक्षा आहे. अशी अपेक्ष निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे