गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा महापौर पदावर सगळ्यांच्या नजरा...
पिंपरी चिंचवडच्या महापौरपदाला विश्वसुंदरी प्रमाणे महत्त्व आले आहे. आता या सत्तासुंदरीचा कोण अभिषेक करतो तो विषय अलविदा...
मुळ विषय आहे यासाठी चाललेली धडपड...
कुणी आमदारांकडे फिल्डींग लावली,
कुणी थेट मंत्र्यांना साकडे घातले आणि काही नेत्यांनी तर मुंबईत मुख्यमंत्र्यांनाच विनंती केलीय.
कोणी जातीच कार्ड खेळतोय,
कुणी प्रदेशाच तर कुणी संघटनांच...
सत्ताधारी पक्षावर दबाव आणुण आमचाच उमेदवार महापौर व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत.
भाजपाचे ७८ नगरसेवक आहेत,
यात २६ ओबीसी प्रवर्गात येतात.
यातही अनेक प्रकार आहेत,
अनेक जाती आहेत आणि आम्हालाच पद मिळावे हा प्रत्येकाचा अट्टाहास आहे.
हाय कमांड जे सांगेल ते येथे होईल, पण गल्लीतील गोंधळ आणि यासाठी दिल्लीला मुजरे सुरू झालेत. शहराचे राजकारण राजधानी मुंबईपर्यंत धडकले आहे.
१२ लाख ४ हजार मतदारांचे प्रतिनिधित्व करणारे आणि उद्योग नगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या या साधन संपन्न शहराचा महापौर होणे हे तसे दिवा स्वप्नच आहे. प्रत्येक नगरसेवक तर महापौर होणार नाही पण ते स्वप्नतर पाहू शकतो. सध्या तेच काम सुरू आहे.
कोणाचे स्वप्न पुर्ण होईल आणि कोणाचे भंगणार ?
हे हायकमांड ठरवणार?
पण ज्या सुमारे बारा लाख लोकांचे प्रतिनिधित्व करायचे त्यांनाही (निवडणुका व्यतिरिक्त ) कधीतरी विचारल पाहिजे, नाही का?