
पिंपरी चिंचवडमध्ये जाधवशाही ? लांडगे गटाने मारली बाजी... शनिवारी होणार फैसला...
भोसरीतील नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौर पदासाठी चिंचवड मतदार संघातील नगरसेवक सचिन चिंचवडे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पण त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदासाठी विनोद नढे यांचा तर उपमहापौरपदासाठी च-होलीच्या नगरसेविका विनया तापकीर यांना उमेदवारी दिली आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज (मंगळवारी) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करायचे होते. त्या प्रमाणे कार्यवाही सुरू असून शनिवारी (दि.4) होणा-या विशेष सर्वसाधारण सभेत सकाळी ११ वाजता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
भारतीय जनता पक्ष 77, राष्ट्रवादी काँग्रेस 36, शिवसेना 9, अपक्ष 5 आणि मनसे 1 असे 128 नगरसेवक आहेत. यापैकी अपक्ष पाच नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे महानगरपालिकेत जाधवशाही येणार हे जवळजवळ निश्चित आहे.