शासनाचा करोडोंचा महसूल बुडवणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई करावी - गिरिश चव्हाण

             पुणे शहराच्या परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी इमारत बांधण्यासाठी केलेल्या उत्खननातून निघालेला कच्चामाल परस्पर लंपास होत असून यामुळे शासनाचा करोडोंचा महसूल बुडवला जात आहे, आणि यात बिल्डर व शासकीय कर्मचारी यांचे हितसंबंध गुंतले आहेत, असा आरोप मराठा महासभेचे पुणे शहराध्यक्ष गिरीश चव्हाण यांनी केला.


             पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी विभाग प्रमुख संजय पायगुडे, सुनिल तोडकर, महेंद्र जुनवणे, दिपक पवार, रोहित किर्दत, राहुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या 2015 च्या राजपत्रानुसार उत्खननातून निघालेला दगड, मुरूम, खडक याचा वापर, त्याच बांधकामासाठी करावा, असा नियम आहे.


            औध येथील उत्खननातून निघालेल्या खडकांचा एक ब्रासही तिथे नसून, संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना कागदपत्रे पुरावा देऊनही बांधकाम व्यावसायिकांवर काहीच कार्यवाही होत नाही.


           शासकीय अधिकारी हे बांधकाम व्यावसायिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे सिद्ध होते. या भ्रष्ट अधिकारी आणि व्यावसायिकांवर कार्यवाही झाली नाहीतर मराठा महासभा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी चव्हाण यांनी दिला

Review