हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी बालेवाडी येथे १५३ कोटी रुपये बाजारमूल्याची ५ हेक्टर ६० आर जागा देण्यास राज्य शासनाची मंजुरी...
हिंजवडी-शिवाजीनगर २३.२ किलोमीटरच्या मेट्रोसाठी बालेवाडी येथे ५ हेक्टर ६० आर जागा देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या जागेचा वाणिज्यिक विकासातून मेट्रोसाठी निधीची उभारणी करण्यात येणार आहे. साधारण बाजारमूल्यानुसार १५३ कोटी रुपये या जागेची किंमत आहे. या मेट्रो प्रकल्पातील शासकीय हिस्सा म्हणून राज्य शासन पीएमआरडीएला ही जागा देत आहे, अशी माहिती पुणे महानगर विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी येथील ५ हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतुकीची समस्या दूर होणार आहे.
- गिरीश बापट, पालकमंत्री