प्रेम एकाशी, लग्न दुसऱ्याशी, तिसऱ्याशी करून चाळा रक्ताने पुसला तिने कुंकवाचा टिळा...
( सह्याद्री बुलेटीन, पुणे )
पती आणि पत्नीचे नातं
हे फक्त आणि फक्त विश्वासावरती टिकून असतं
पण ज्यावेळी हा विश्वास तुटला जातो
त्यावेळी मात्र अनेक कुटुंब उध्वस्त होतात
बरबाद होतात आणि म्हणून आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणं
हेच सुखी संसाराचे सूत्र आहे
ती एक विवाहित स्त्री
सुखाने संसार सुरु
पण ती मात्र संसारात रमली नाही
तिचं दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम
आणि पतीला सोडून त्याच्याशी लग्न करण्याची तिची इच्छा
यामध्ये मोठा अडसर होता तिचा पती
आणि मग मनात विचार घोळू लागले
त्याचा खून करण्याचा
सुरू झाले प्लॅनिंग
सुरू झाले षड्यंत्र
आणि तिला खात्री होती
यात माझा प्रियकर मदत करीन
तिने नवर्याला मारायचा प्लॅन प्रियकराला सांगितला
पण तोही चलाख
त्याने हत्या करायला नकार दिला
हीच काळीज तुटलं
पण नाही
पतीला मारायचं
हे पक्के होते
या विचारांनी तीने दुसराच कोणीतरी पकडला
हा दुसरा,
दुसरा - तिसरा कोणी नसून
तिच्या बहिणीचा पती होता...हरेश
तिने त्याच्यावर नजर टाकायला सुरुवात केली
त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले
पूर्णपणे आपल्या कह्यात आणले
त्याला आपल्या प्रेमात वेडे बनवले
त्याच्याशी संबंध सुरू केले
आणि
ज्यावेळी तो पूर्णपणे आपल्यासाठी वेडा झालाय
हे लक्षात आलं
त्या वेळेस नवर्याला मारण्याचा प्लॅन सांगितला
"तु जर माझ्या नवऱ्याला ठार केले तर
मी आयुष्यभर तुझी गुलाम बनवून राहील"
एका वासनांध स्त्रीने
वासनांध पुरुषाला
पूर्णपणे वेड बनवलं होतं
तोही पूर्ण पागल होता
आणि
ठरले
स्वतःच्याच साडूचा खून करायचा
एक दिवस त्याला कामानिमित्त
याने निर्जनस्थळी बोलावून घेतले
तिथेच त्याला मारायचं ठरवलं
पण तो प्लॅन फसला
पुन्हा दोन दिवसानंतर मात्र
पतीला निर्जनस्थळी बोलावण्याचा प्लान झाला
आणि त्याच ठिकाणी त्याला बोलावून घेतलं त्याच्यावर चाकूने वार केले
तेथेच त्याला ठार केले
चाकू नदीत फेकून दिला
आणि काहीच झाले नाही
या आविर्भावात या आरोपींचे जीवन सुरु झाले...
अर्थातच पोलिसांनी या दोन्ही गुन्हेगारांना अटक केली आहे आणि पुढील तपास चालू आहे.
मुळ घटना
एक ऑगस्टला अहमदाबाद जवळील जगतपुर येथे "दिलीप पांचाळ" यांची हत्या करण्यात आली. ही सुपारी त्याची पत्नी "शीला पांचाळ" दिली होती. तिचे "गोपाळ गोहिल" याच्याशी संबंध होते. यात पती अडथळा होता. त्याला मारायचा प्लॅन होता, पण गोपाळने नकार दिल्यामुळे, तिने बहिणीच्या नवऱ्याला ( हरेश ) जाळ्यात ओढले, आणि या हरेशने आपल्या साडू चा खून केला.

या खून सत्रामधून कोणाला काय मिळाले?
शिल्पाने स्वतःचा संसार तर बरबाद केलाच पण स्वतःच्या बहिणीच्या संसाराचे ही वाटोळे केले.
दोन कुटुंब देशोधडीला लागली, त्यांची मुलं रस्त्यावर आली,
केवळ वासनेमुळे हे सर्व घडले,
जर यांच्यात थोडी जरी नैतिकता, लाज आणि आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम असतं, तर हे घडलं नसतं.
असो...
शेवटी जसे कर्म असेल तर त्याला तसेच फळ मिळेल. आणि मिळतेच.
पण वाईट या गोष्टीचे वाटते की,
जे लोक चांगले होते, प्रामाणिक होते, त्यांनाही या नालायक लोकांमुळे आयुष्यभराचं दुःख भोगावे लागले.
म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीत चारित्र्याला फार महत्त्व आहे. ते जपण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न जर केला, तरच आपण आणि आपलं कुटुंब सुखांमध्ये राहू शकते.