महापौरपदी भाजपचे राहुल जाधव, उपमहापौरपदी सचिन चिंचवडे...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना ८०, तर राष्ट्रवादीला ३३ मते मिळाली. त्यामुळे महापौरपदी भाजपचे राहुल जाधव विजयी झाले. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सचिन चिंचवडे यांना ७९, तर राष्ट्रवादीला ३३ मते मिळाली. त्यामुळे उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांनी निवड झाली.
पीठासीन अधिकारी नयना गुंडे यांनी सकाळी अकरा वाजता महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण केल्यावर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी दिला. कोणीच माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आले. भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना भाजपची ७७ आणि अपक्ष ३ अशी एकूण ८० मते मिळाली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ३३ मते मिळाली. त्यामुळे महापौरपदी भाजपचे राहुल जाधव विजयी झाले.
याचप्रमाणे उपमहापौरपदासाठीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. भाजपच्या सचिन चिंचवडे यांना ७९ मते, तर राष्ट्रवादीला ३३ मते मिळाली.

Review