निवडणुका व विकास याचा संबंध नाही - राज ठाकरे
नाशिक (सह्याद्री बुलेटिन ) - आम्ही मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली, पण मतपेटीतून नाशिककरांनी अविश्वास दाखविला. त्यामुळे विकास कामे करूनही मतं मिळतात, यावरील माझा विश्वास उडाला असून निवडणुका व विकास याचा संबंध नसल्याचे माझे ठाम मत झाल्याची खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
एक दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृहावर अनौपचारीक गप्पा मारतांना विविध विषयांवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, मनसेच्या सत्ता काळात नाशिककरांवर एक रुपयांची करवाढ न लादता स्वबळावर मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. स्मार्ट सिटी मध्ये पुर्ण झालेल्या ज्या कामांची यादी दाखवली जाते. ती कामे मनसेने सीएसआर फंडातून केली. पण ध्येय धोरणे नसलेल्या भाजपने नाशिककरांवर मोठी करवाढ लादल्याने नाशिककरांची हौस फिटतं आहे.सत्तेत असलेल्या पक्षाकडे ध्येय धोरणे असतात. त्या धोरणांची अंमलबजावणी प्रशासन करते. नाशिक मध्ये सत्ताधाऱ्यांचा वचकं नसल्याने प्रशासन मुजोर झाले आहे. प्रशासनचं सर्व कामे करतं असतील तर निवडणुका तरी कशाला घ्यायच्या? असा सवाल ठाकरे यांनी केला. कालिदास नाट्यगृहाचे दर मुंबई पेक्षा अधिक आहे. प्रशासनाने जाहिर केलेले दर कमी असावे असे मत व्यक्त करताना दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
नाशिकचा पराभव हा ठाकरेंच्या फारच जिव्हारी लागला होता. इथूनपुढे निवडणूक जिंकण्यासाठी काय काय करावे लागेल ते सर्व करणार, असे त्यांनी मुंबईतील एका सभेत जाहीर केले होते.