सावत्र आईनेच रचला मुलीच्या बलात्काराचा आणि खुनाचा कट

काश्मीर(सह्याद्री बुलेटिन ) - मुलीचा बलात्कार आणि खून हा सावत्र आईनेच केल्याची धक्कादायक आणि माय-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जम्मू-काश्मीरमध्ये घडली. 9 वर्षांच्या मुलीच्या सामूहिक बलात्कार व निर्घृण हत्या करण्याचा कट तिच्या सावत्र आईनंच रचल्याची हादरवणारी आणि तितकीच चीड आणणारी माहिती समोर आली आहे.
23 सप्टेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाली होती आणि 2 सप्टेंबरला तिचा मृतदेह जंगलात आढळून आला होता. याप्रकरणी सावत्र आईसहीत तिचा मुलगा आणि तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलीच्या वडिलांच्या दोन पत्नी होत्या. यातील एक जण मूळची झारखंडची आहे तर दुसरी काश्मीरमधीलच आहे. ज्या मुलीची हत्या करण्यात आली, ती झारखंडमधील पत्नीची मुलगी होती. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी महिलेनं सांगितले की, पती दुसऱ्या पत्नीसोबत अधिक वेळ घालवायचा आणि आपल्या सर्व मुलांमध्ये याच मुलीचे सर्वात जास्त लाड व्हायचे. यामुळे कौटुंबिक तणाव वाढत होता. सावत्र आई मुलीला घेऊन जंगलाच्या दिशेनं गेली. यावेळेस तिनं स्वतःसोबत चाकूही घेतला होता. याच चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळाहून चाकू आणि कुऱ्हाड ताब्यात घेण्यात आली आहे.

Review