शिर्डी - दिल्ली - बंगळुरू विमानसेवा सुरू होणार
शिर्डी (सह्याद्री बुलेटिन ) - शिर्डीहून हैदराबादसाठी नियमित सेवा सुरू झाली. शिर्डीहून दिल्लीसाठीही विमानसेवा सुरू व्हावी अशी साईभक्तांची मागणी हाेती. ती अाता पूर्ण हाेत अाहे. दिल्लीसाठी २० सप्टेंबरपासून व एक १ आॅक्टोबरपासून बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होत असल्याची माहिती विमानतळाचे संचालक धीरेन भोसले यांनी दिली.
स्पाइसजेट एअरलाइन्सचे बोइंग ७३७-८०० हे १८९ आसनी विमान २० सप्टेंबरपासून सुरू हाेईल. दिल्लीतून दुपारी १२.४५ वाजता निघुन हे विमान २.३० वाजता शिर्डीत पोहोचेल. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर दुपारी तीन वाजता ते दिल्लीसाठी उड्डाण करील. तसेच स्पाइसजेटचे क्यू-४०० हे ७८ आसनी विमान एक अाॅक्टाेबरपासून सुरू हाेईल. बंगळुरूहून सकाळी ते शिर्डीला येईल. त्यानंतर मुंबईला जाईल. मुंबईहून परत येऊन बंगळुरूला जाईल,