३६ वर्षीय तरुणाने केला सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार...
वाकड (सह्याद्री बुलेटिन ) - उच्चभ्रू सोसाटीमध्ये राहत असलेल्या एका आयटी अभियंत्याने एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
थेरगाव येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय तरुणाला या प्रकरणी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत सहा वर्षीय चिमुकली आणि आरोपी हे पवारनगर येथील एकाच इमारतीत राहतात. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्याने सहा वर्षाच्या चिमुकलीला खेळण्याच्या बहाण्याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बोलवून घेतले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घडलेला प्रकार पिडीत चिमुकलीने तिच्या आईला सांगितला. तेव्हा हा प्रकार समोर आला. पिडीतेच्या आईने तातडीने वाकड पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीलाअटक केली आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.