पर्यायी इंधनांवर चालणाऱ्या वाहनांना परमीटपासून मुक्ती - नितीन गडकरी

दिल्ली (सह्याद्री बुलेटिन ) - सरकारने इलेक्टीक वाहन, एथेनॉल, बायो-डिझेल, सीएनजी, मेथनॉल आणि जैव इंधन यांसारख्या पर्यायी इंधनांवर चालणाऱ्या वाहनांना परमीटपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. सियामच्या वार्षिक संमेलनात संबोधित करताना ते बोलत होते.ई-वाहन उत्पादित कंपन्यांना ई-वाहन गाड्यांच्या निर्मित्तीकडे लक्ष देण्याचेही सांगितले आहे. तसेच ओला आणि उबर यांसारख्या कार सर्व्हीस प्रोव्हायडर कंपन्यांनीही ई-वाहनांचा जास्त वापर करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

नितीन गडकरींनी ई-वाहनांवर जोर देणार असल्याचे सांगितले. सरकारने इलेक्टीक वाहन, एथेनॉल, बायो-डिझेल, सीएनजी, मेथनॉल आणि जैव इंधन यांसारख्या पर्यायी इंधनांवर चालणाऱ्या वाहनांना परमीटपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राज्य सरकारांनीही ई-वाहनांना सवलत देण्यास होकार दर्शविल्याचेही गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांनी ई-वाहन उत्पादिक कंपन्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. मात्र, कुठलिही आर्थिक मदत देण्यास स्पष्ट नकार दिला. सध्या, ई-वाहनांवर 12 टक्के जीएसटी आहे. त्यामुळे कुठल्याही सबसिडीची गरज आहे. माझ्या मंत्रालयाने आगामी पाच वर्षात वित्तीय सहायताशिवाय ई-वाहनांच्या उत्पादनात वाढ करता येईल, याबाबतच अहवाल सादर केला आहे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

Review