इतिहासाच्या संवर्धनासाठी मोडी लिपी आवश्यक - प्राचार्य दिघे...

प्रवरानगर (सह्याद्री बुलेटीन) साईप्रसाद कुंभकर्ण :- भविष्यात वाटचाल करण्यासाठी इतिहास हा मार्गदर्शक असतो, आणि इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कागदपत्रांचे वाचन करणे गरजेचे असते, शिवकालीन पेशवेकालीन व ब्रिटिशकालीन काळातील 1950 पर्यंत पर्यंतची कागदपत्रे ही मोडी लिपीत आहेत, आणि तो इतिहास माहिती करून घेण्यासाठी मोडीलिपी आवश्यक आहे. यामुळे इतिहासाचं संवर्धन होणार आहे, असे प्रतिपादन पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. दिघे यांनी केले.

 
पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय प्रवरानगर इतिहास विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ आणि वसुंधरा मोडी भाषा लिपी संवर्धन व संशोधन केंद्र, पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात मोडी भाषा लिपी आरंभिक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एम दिघे यांच्या हस्ते पार पडले.
 
मोडी भाषा लिपी प्रारंभिक प्रशिक्षण विद्यार्थी व नागरिकांना देण्यासाठी, मोडी प्रशिक्षक वसुंधरा मोडी भाषा लिपी संवर्धन व संशोधन केंद्र पुणे या संस्थेचे अध्यक्ष महेश जोशी सहा दिवस मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक प्राध्यापक निळे एस पी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पाटील यांनी केले. इतिहास विभागातील राजभोज सर व लबडे मॅडम यांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य मिळाले.
 

Review