रामलीलावर एकवटला विरोधक - सरकार विरोधाचा एल्गार...

दिल्ली (सह्याद्री बुलेटिन )- इंधन आणि गॅसच्या दरांमध्ये सातत्याने होणारी वाढ,आणि महागाई यांच्या निषेधार्थ दिल्लीमधील रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासहित विरोधी पक्षनेते एकवटले आहेत.
नरेंद्र मोदी सरकराने हुकूमशाही पद्धतीने, मनमानी करत, देशाचं हित नसणाऱ्या अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे सरकार बदलण्याची वेळ आली आहे,हा सरकार विरोधात विरोधकांनी एल्गार केला.
राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला असून, जनतेने मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. २१ विरोधी पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे.यात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

काँग्रेसचे हे आंदोलन नागरिकांना दिलासा देण्यासाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेचे, व्यापाऱ्यांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.

 

Review