भाजपा नेत्यांची पत गेली महाराष्ट्रात सत्तातंर अटळ -पृथ्वीराज साठे
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)-राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त व राष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने युवक काँग्रेस च्या चलो वार्ड अभियानाचा शुभारंभ मोरवाडी येथून करण्यात आला.राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पुजन प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे व काँग्रेस चे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते करून अभियानाची सुरूवात करण्यात आली.
या अभियानातंगर्त युवा शक्ती कार्ड द्वारे युवकांची नोंदणी करण्यात येत आहे तसेच रियालिटी चेक फार्म द्वारे भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश करण्यात येत आहे. हे अभियान शहरातील सर्व प्रभागातून राबविण्यात येणार आहे.याप्रसंगी बोलताना प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे म्हणाले, “भाजपच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते खालच्या पातळींवर जाऊन काँग्रेस नेत्यांवर टिका करू लागले आहेत वास्तविक पाहता ते सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहेत व यामुळेच जनतेचा भरभरून पाठिंबा काँग्रेस ला मिळत आहे आता महाराष्ट्रात सत्तातंर अटळ आहे”
मोरवाडी लालटोपीनगर चौकातील या कार्यक्रमास प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पृथ्वीराज साठे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक अख्तार चौधरी, युवक काँग्रेस चे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शहर काँग्रेस चे पदाधिकारी ॲड.अनिरूध्द कांबळे, मुनसाब शेख, तुषार पाटील, युवक काँग्रेस चे पदाधिकारी गौरव चौधरी, विरेंद्र गायकवाड, कुदंन कसबे, युसुफ पठाण, शफी शेख पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिरा जाधव, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संदेश बोर्डे, भोसरी विधानसभा अध्यक्ष नासीर चौधरी आदी पदाधिकारी व परिसरातील नागरिक शिवराज वाघमारे, रशीद सय्यद, मेहबूब शेख, बाळासाहेब डावरगावे, बाळासाहेब गायकवाड, दादा शिरोळे, सईद खान, एजाज चौधरी, आफताब चौधरी आदि उपस्थित होते. प्रास्ताविक नरेंद्र बनसोडे व आभारप्रदर्शन गौरव चौधरी यांना केले.