अमेरिकेच्या ओबामा आणि हिलरींनंतर आता भारतातील भाजपच्या श्वेता शालिनी यांना Quora चे निमंत्रण...

दिल्ली (सह्याद्री बुलेटिन ) - महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्त्या आणि उत्तर भारतीय युवा नेत्या श्वेता शालिनी यांना Quora कडून 21 जानेवारी रोजी होणाऱ्या Live Session साठी निमंत्रण मिळाले आहे. असा सन्मान मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. याच्याआधी या व्यासपीठावरुन बराक ओबामांनी त्या वेळेसच्या राजकीय घटनांवर म्हणजेच इराण अणुकरार तसेच ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशीप (TPP) यांवर उत्तरे दिली आहेत. 'हिलरी क्लिंटन' यांनी तर याच व्यासपीठाचा वापर करुन 'मुस्लिम विरोधक' अशी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली होती.

तर काय आहे हे Quora?
Quora हे एक ज्ञानाची देवाण घेवाण करण्याचे मोठे माध्यम आहे. 'A place to share knowledge and better understand the world' या उदघोषाने त्याची अमेरिकेत निर्मिती झाली. लोक याच्यावर त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांकडून मिळवू शकतात. दर महिन्याला 7 कोटी भारतीय Quora च्या ज्ञानात भर घालतात. त्यांच्या 'VIP Taking Sessions' या कार्यक्रमासाठी Quora राजकीय नेत्यांना,शास्त्रज्ञांना,वेगवेगळ्या कंपन्यांना बोलावत असते.


ज्ञानाची देवाण घेवाण करण्याचे मोठे माध्यम असल्याकारणाने ते वेगवेगळ्या वेबसाईट वरची रहदारी मोजणाऱ्या Alexa रँकिंग मध्ये 19 व्या स्थानी आहे. वस्तूंची मोठया प्रमाणात विक्री करणाऱ्या ऍमेझॉन या कंपनिला त्याने या रँकिंग मध्ये मागे टाकले आहे. काही महिन्यांपूर्वी Quora हे हिंदी मध्ये उपलब्ध झाले. श्वेता जी भारतीय युवकांना हिंदीत योग्य मार्गदर्शन करतील याच्यात कोणाचेच दुमत नाही आणि भारतीय युवकांना याचा नक्कीच फायदा होईल,यात शंका नाही.


याच्यात काही आश्रर्य नाही की त्यांना हा सन्मान मिळाला कारण त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात ज्ञानाचे देवाणघेवाण करण्याचा अनुभव आहे. Facebook चे COO शेरील सँडबर्ग सारख्या महिलांना निमंत्रण देणारा Quora ने BJP च्या नेत्या महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तीन कंपन्यांच्या यशस्वी उद्योजिका यांच्या पारड्यात हा मान टाकला आहे. त्यांना राजकीय,माहिती तंत्रज्ञान आणि ग्रामीण जीवनासारख्या वेगवेगळ्या क्षेत्राचा अनुभव आहे. मोदी सरकारचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊन लोकसभेचा रणसंग्राम तोंडावर असताना 21 तारखेला श्वेताजींना कशी प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्या कोणत्या प्रकारचे प्रश्न निवडतात आणि त्यांना कशी उत्तरे देतात हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे. त्या पूर्वीपासूनच Quora वरील “भारतीय जनता पार्टी” विषय च्या Top Writers पैकी आहेत. या मिळालेल्या संधीमुळे त्यांचे Quora वरील वर्चस्व अजून वाढणार आहे. BJP च्या महिला सबलीकरणाचा हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.यामुळे काँग्रेस चे Quora वरील अस्तित्व संपुष्टात येण्यास मदत होणार आहे आणि राहुल गांधींनी Quora मधील युवकांना आकर्षित करण्यासाठी लढाई आधीच शस्त्र टाकले आहे.

Review