क्रांती मित्र मंडळाला जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धेत ‘अजिंक्यपद’
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे नुकत्याच पुणे जिल्हा कबड्डी आसोसिएशनच्या वतीने किशोर गट जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पिंपळे सौदागर येथील क्रांती मित्र मंडळाने अजिंक्यपद पटकावत आपले निर्विवाद वर्चस्व राखले.
यावेळी आंतराष्ट्रीय पंच दत्तात्रय झिंजुर्डे, मंडळाचे अध्यक्ष सुरज काटे उपस्थित होते. सुरज काटे यांचे वेळोवेळी होणारे उत्कृष्ट मार्गदर्शन हे या यशाचे प्रमुख कारण मानले जाते आहे. नगरसेविका निर्मलाताई कुटे व शत्रुघ्न काटे यांनी संघाचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.