बेटी बचाओ बेटी पढाओ पिंपरी चिंचवड संयोजक अमित गुप्ता यांना नॅशनल युथ आयकाॅन पुरस्कार प्रदान..

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)-स्वामी विवेकानंद जयंती निमित्त देशभरातुन ३० युवकांना त्यांच्या समाज कार्यासाठी गौरविण्यात आले. ह्युमन राईट इंटरनॅशनल फेडरेशन आणि ॲन्टी करप्शन फेडरेशन आॅफ इंडीया यांच्या वतिने दिला जाणारा युथ आयकाॅन २०१९ या पुरस्काराने अमित गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले.

अमित गुप्ता यांनी अनेक मुलींना शिक्षण, लग्न या करिता मदत केली आहे. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ च्या माध्यमातुन मुलींसाठी स्पर्धा, कन्या पुजन, पथ नाट्या अश्या अनेक सामाजिक कार्यातुन समाजात बेटी बचाओ बेटी पढाओ चा संदेश पोहोचवला. स्वच्छ भारत आणि डिजीटल इंडीया या मोहीमेच्या प्रसारात त्यांचा त्यांच्या परिसरात मोलाचा वाटा आहे.

Review