व्यंगचित्रातून नरेंद्र मोदींवर ;राज ठाकरे यांचा निशाणा

मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माधय्मातून मोदी सरकारवर टीका करण्याचा जणू विडाच उचलला आहे. राज ने पुन्हा एकदा आज त्यांच्या व्यंगचित्रातून मोदींना निशाणा केले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळत असल्याचा टोला राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रातून लगावला आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरवर नरेंद्र मोदींवर निशाणा साधणारे व्यंगचित्र शेअर केले आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला काँग्रेसने छळले होते, असे मोदींनी म्हटले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे. काँग्रेसने मला छळले, म्हणून मी जनतेला छळतो, असे या व्यंगचित्रात रेखाटण्यात आले आहे.

Review