शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघातर्फे- ५८ महिलांना संजय गांधी पेन्शनची प्रमाणपत्रे वाटप

आकुर्डी,(सह्याद्री बुलेटीन) - शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आकुर्डी भागातील ५८ महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत पेन्शनची प्रमाणपत्रे वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला.

खासदार श्रीरंग बारणे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते महिलांना ही प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी संजय गांधी समितीचे सदस्य आप्पा कुटे यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे तहसीलदार राधिका बारटक्के, नगरसेविका वैशाली काळभोर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष नितीन घोलप आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर नागरिकांच्या मनोरंजनासाठी महाराष्ट्राची लोकधारा ही संगीतरजनी झाली.

Review