सात वर्षीय चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार करून अज्ञात नराधमाने केला खून;संशयित आरोपीची आत्महत्या
दापोडी,(सह्याद्री बुलेटीन) - सात वर्षीय मुलीचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळल्याने दापोडी परिसरात खळबळ उडाली आहे. या चिमुरडीवर अनैसर्गिक कृत्य करून तिचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात असून यातील संशयित आरोपीने आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना आज सकाळी घडली.
या घटनेनंतर अज्ञाप आरोपी फरार झाला असून चिमुरडीचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. दरम्यान , संशयित आरोपीने दापोडी येथील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीची आई कामासाठी आणि मोठी बहीण शाळेत गेल्यानंतर मुलगी घरी एकटीच होती. अज्ञात नराधमाने तिच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. तसेच तिचा गळा दाबून खून केला. आई कामावरून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.