
मोदींनी चहा कधी विकलाच नाही; हा केवळ पब्लिसिटी स्टंट-प्रविण तोगडिया
नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)-चहा विकणारा सामान्य नागरिक पंतप्रधान बनू शकतो, असा प्रचार भाजपने २०१४ च्या निवडणुकीत केला होता. मात्र, भाजपचे हे वक्तव्य धुडकावून लावत विश्व हिंदू परिषदचे माजी अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. मोदींनी चहा कधी विकलाच नाही. हा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे तोगडिया यांनी म्हटले आहे. हा विषय छेडत तोगडिया यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील निशाणा साधला.
तोगडिया म्हणाले, की मी नरेंद्र मोदी यांना ४३ वर्षापासून ओळखत आहे. त्यांना मी कधीच चहा विकताना पाहिलेले नाही. हा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मी डॉक्टर होतो. हे जर माझ्या ओळखीच्या माणासांना विचारलात तर तुम्हाला मी डॉक्टर असल्याचा पुरावा मिळेल. पण मोदी चहा विकत होते यासंदर्भात कुणाकडेही पुरावा नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
राम मंदिरासंदर्भात मुद्दा मांडताना त्यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, की भाजप आणि आरएसएसच्या मनात राम मंदिर बांधण्याविषयी कोणतीही भावना नाही. ही गोष्टी मोदी यांच्यानंतर आरएसएस नेता भैयाजी जोशी यांनी देखील राम मंदिर पुढील पाच वर्ष बांधता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या दोघांनी मिळून जनतेला अंधारात ठेवले आहे.
आरएसएस राम मंदिर कधीच बांधू देणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की, ज्या दिवशी मंदिर उभारेल त्याच दिवशी देान्ही संघटना संपुष्टात येतील. त्यामुळे दोन्ही संघटना राम मंदिरचा प्रश्न तसाच ज्वलंत ठेवत आहेत. तिहेरी तलाकाचा निर्णय अर्ध्या रात्री घेऊ शकता तर राम मंदिरचा का नाही? असा सवाल देखील तोगडिया यांनी केला.