प्रसिद्ध मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते 'रमेश भाटकर' यांचे निधन

मुंबई,(सह्याद्री बुलेटीन)- मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे वयाच्या ७० व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झालं आहे. एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनसृष्टीत शोककळा पसरली आहे.नुकत्याच पार पडलेल्या ९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन २०१८ मध्ये रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी, कमांडर, बंदिनी अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. मालिकांशिवाय माहेरची साडी, माझं सौभाग्य, अष्टविनायक, आपली माणसं, गृहलक्ष्मी अशा सिनेमांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका प्रेषकांच्या पंसतीस पडल्या होत्या.
चिटपटांबरोबरच नाटकांमध्येही त्यांची कारकीर्द मोठीच राहिली. अश्रूंची झाली फुले, मुक्ता, उघडले स्वर्गाचे दार, देणाऱ्याचे हात हजार अशा 50 पेक्षा अधिक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी काम केलं.

Review