संतपीठाचा प्रस्ताव गोंधळाच्या वातावरणात मंजुर;विरोधकांकडून गोंधळ ‘मानदंड’ पळवण्याचा प्रयत्न

पिंपरी, सह्याद्री बुलेटीन) पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या संतपीठाच्या प्रस्तावाला गोंधळाच्या वातावरणात मंजुरी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या विषयाला सभागृहात सुरूवात होताच प्रचंड गोंधळ उडाला. विरोधकांकडून गोंधळ सुरू होताच महापौरांनी हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहिर केले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ही सभा एक तासासाठी तहकूब करण्यात आली.

 

Review