स्थायी अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या प्रयत्नातून वाकड-पिंपळे निलखमध्ये सिमेंट काँक्रिटचे रस्ते मार्गी

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- वाकड-पिंपळे निलख परिसरातील कावेरी चौक, सबवे ते पिंक सिटी कॉर्नर आणि काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक येथील सिमेंट काँक्रिट रोडच्या विकासकामास आज स्थायी समिती सभेत स्थायी समिती सभापती ममताताई विनायक गायकवाड यांनी मंजुरी देत हा विषय मंजूर केला. कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक दिवस वाकड-पिंपळे निलख परिसरातील रोड सिमेंट काँक्रिटचे होण्याकरिता स्थायी समिती अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड व मा.नगरसेवक विनायक गायकवाड पाठपुरावा करीत होते.


यावेळी स्थायी समिती अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड म्हणाल्या की "वाकड-पिंपळे निलख मधील हे सिमेंट काँक्रिटचे रस्ते हे मॉडेल रोडच्या धर्तीवर तयार करण्यात येणार आहेत. या रस्त्यांमध्ये नागरिकांना चालण्यासाठी प्रशस्त फुटपाथ, वाहनांना पार्किंगसाठी पार्किंग व्यवस्था, विविध ठिकाणी सोलर चार्जिंग युनिट, नागरिकांना व ज्येष्ठांना बसण्यासाठी आरामदायी व आकर्षक बेंचेस, विविध ठिकाणी सोलर चार्जिंग युनिट्स, डस्टबीन, बोलार्ड बसविणे, विविध ठिकाणी फुटपाथ लागत हरितपट्टा तयार करणेत येणार आहेत, विविध सेवावाहिन्यांनसाठी डक्टची व्यवस्था असणार आहे. असे हे स्मार्ट कॉंक्रीट रस्ते वाकड-पिंपळे निलख मधील नागरिकांना लवकरच पाहायला व अनुभवायला मिळतील"
आजच्या स्थायी समितीच्या सभेत या रस्त्यांच्या विषयास स्थायी समिती सभापती ममताताई विनायक गायकवाड यांनी तात्काळ मंजुरी देत ही कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासंदर्भात संबंधित विभागास निर्देश दिले.

Review