पिंपरी-चिंचवडमध्ये महिला, मुलींची सुरक्षितता धोक्यात

विनयभंग, बलात्काराच्या घटनांमुळे निर्माण होतो प्रश्न

प्रविण डोळस

पिंपरी - (सह्याद्री बुलेटीन) मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील बलात्कार, विनयभंग आणि छेडछाडीच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिला, मुलींवरील अत्याचाराच्या या घटनांमुळे उद्योगनगरीत महिला, मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्न विचारला जावू लागला आहे. त्यात स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्यानंतर देखील हा हे गुन्हे कमी होत नसल्यानेही चिंता व्यक्त होत आहे. 


पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज महिला, मुलींबाबत चुकीच्या घटना घडतात. या प्रकारची मानसिकता समाजात कुठून येते, हा प्रश्न निर्माण होता.
लहानश्या चिमुरडीला ही नराधमांकडून सोडले जात नाही. लग्नाचे आमिष आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा घटना वारंवार समोर येतात. विनयभंगाच्या छेडछाडीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मुली, महिलांवरील लैंगिक अत्याचाराबरोबर अल्पवयीन मुलांवर देखील अनसैर्गिकपणे अत्याचार झाल्याच्या घटना वाढत आहेत.
बलात्कार, छेडछाड आणि विनयभंगाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून मुकबधीर, अपंग, अल्पवयीन मुलांच्या लैगिंक शोषणाचा मुद्दा गंभीर होत आहे.

कामानिमीत्त बाहेर पडलेल्या युवती व महीला सुरक्षीत राहील्या नाहीत. पिंपरी-चिंचवड शहरातील  महीलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.अशा या विकृतीचे प्रमाण वाढते आहे.त्यामुळे महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून ह्या वाढत्या अल्पवयीन मुले आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाराला कसा आळा बसेल ? याच्यावर कडक कार्यवाही करून महीलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर येणार नाही, यासाठी पोलिस यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. 

Review