शबरीमला प्रकरण :अय्यप्पा मंदिरात महिलांना मिळणार मुक्त प्रवेश

नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन ) – केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाची परवानगी देण्याविरोधात भूमिका घेणाऱ्या त्रावणकोर देवस्थान मंडळाने आता युटर्न घेतला आहे. शबरीमला मंदिरात आता सर्वच वयोगटातल्या महिलांना पुजेचा अधिकार आहे. आमची त्यासाठी कुठलीही हरकत नसल्याची भूमिका बोर्डाच्या वकिलाने घेतली. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निकाल राखून ठेवला. याप्रकरणी पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी सर्व वयोगटातील महिलांसाठी शबरीमला मंदिरात प्रवेश देण्यासंदर्भात ऐतिहासिक निर्णय दिला होता. मात्र देवस्थान मंडळाने याविरोधात भूमिका घेत कडाडून विरोध केला होता. मात्र मंडळाने अखेर माघार घेत सर्व वयोगटांतील महिलांवरील प्रवेशबंदी उठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे समर्थन केले आहे.

 

Review