राष्ट्रवादी युवक काँग्रेस बेरोजगारी विरोधात आंदोलन
पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) – राज्यभरासह पिंपरी-चिंचवड शहरात बेरोजगारी वाढविणा-या भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. निगडीतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर नारेबाजी करून भाजप सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.
मागील 45 वर्षातील बेरोजगारी चा उच्चांक 2014 ते 2019 या भाजप च्या काळात गाठला, सर्वे च्या माहितीनुसार 2014 नंतर देशातील दररोज 514 लोक बेरोजगार झाले आहेत ह्याच बेरोजगारी विरोधात
आज गुरुवारी सकाळी 11:30 वाजता सुमारास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी -चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते.
भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यभरातील सुशिक्षीत तरुणांना नोकरी देण्याचा शब्द दिला होता. सत्तेवर येऊन चार वर्षांचा कार्यकाळ संपला तरी राज्यभरासह पिंपरी-चिंचवड शहरातल्या तरुणांना नोकरी मिळालेली नाही. उलट बेरोजगारी वाढली आहे. दरवर्षी शिक्षण घेऊन बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. नोकरी देण्याच्या नावाखाली भाजपने या तरुणांची फसवणूक केली आहे. याच्या निषेधार्त राष्ट्रवादी युवक पदाधिका-यांनी भाजप सरकारच्या विरोधात नारेजबाजी केली. बेरोजगारीला कंटाळून तरुणांवर वडापाव स्टॉल टाकण्याची वेळ आली आहे. हा संदेश युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आंदोलनातून दिला.