पुणे : उद्यापासून तीन दिवस नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद
पुणे,(सह्याद्री बुलेटीन)- मेट्रोच्या खांबांची उभारणी करायची असल्यामुळे नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी शुक्रवारी (ता. 8) रात्री 8 ते सोमवारी (ता. 11) सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्या वेळी वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त प्रभाकर ढमाले यांनी केले आहे.
मेट्रोला काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. महामेट्रो दिवसरात्र काम करणार आहे. सोमवारी रस्ता सकाळी लवकर खुला करण्याचा प्रयत्न करू, असे महामेट्रोने म्हंटले आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे चालकांचा गोँधळ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नदीपात्रात आणि पर्सिस्टंटच्या इथे काही ठिकाणी बोर्ड लावले आहेत.