सत्तेत आल्यास ट्रिपल तलाक कायद्याला रद्द करू,काँग्रेसची मोठी घोषणा !
नवी दिल्ली,(सह्याद्री बुलेटीन)- ट्रिपल तलाक संदर्भात काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक महाअधिवेशनात बोलताना महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता देव म्हणाल्या, जर आमचे सरकार आले तर नरेंद्र मोदींनी आणलेल्या ट्रिपल तलाक कायद्याला रद्द करू, या कायद्यामुळे मुस्लिम युवकांना कारागृहात पाठवण्याचे षडयंत्र असल्याचे सुद्धा त्या म्हणाल्या.
काँग्रेसने लोकसभा २०१९ साठी जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक सभेच्या माध्यमातून अल्पसंख्यांक मतांवर काँग्रेसचा डोळा असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राहुल गांधी यांनी भाजप समवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत यांच्यावर सुद्धा टीका केली. ते म्हणाले, देशाचा पंतप्रधान तोडणारा नाही तर जोडणारा पाहिजे नाहीतर अश्या पंतप्रधानांना हटविले पाहिजे. आरएसएस नागपूरमधून देश चालवत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.