अण्णा हजारे यांच्यासंबंधी बोलणे आणि वाचणे मी गेली दोन वर्षे सोडून दिलं – शरद पवार
बारामती,(सह्याद्री बुलेटीन)–अण्णा हजारे यांच्या उपोषण या विषयावर बोलणे आणि बातम्या वाचणे मी गेली दोन वर्षे सोडून दिलं आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसटे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे बैठक पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
‘अण्णा हजारे यांच्याविषयी काही पाहणे आणि बोलायचे नाही असं मी दोन ते तीन वर्षांपूर्वीच ठरवलं आहे. त्यांच्याबद्दल कुठलंही वृत्त छापून आलं तरी मी ते वाचत नाही,’ असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींसहित अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. संसदेत आजवर लोकसभेच्या अखेरच्या सत्रातील अनेक पंतप्रधानांचे भाषणे पाहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेतील गुरुवारचे भाषण वाचनात आले. त्यांचे भाषण प्रथेला धरून नव्हते. त्यांच्यावर जसे संस्कार झाले, त्यानुसारच ते बोलले आहेत,अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. यावर ते म्हणाले की, लोकसभेसोबत विधानसभा एकत्र झाली. तर महाराष्ट्रातील जनतेची सात महिने अगोदर सुटका होईल, अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
प्रियंका गांधी यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्याचा फायदा काँग्रेसला किती होईल, या प्रश्नावर शरद पवार यांनी भाष्य करणे टाळले. शिरुर आणि मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराबाबत काही चर्चा झाली आहे का? मध्यंतरी शिरुरमधून कोणी लढवण्यास इच्छुक नसल्यास मी उभा राहतो अशी घोषणा केली होती. त्या जागेबाबत काही चर्चा झाली का? त्या प्रश्नाबाबत शरद पवार म्हणाले की, शिरूरमधून अजित पवार यांनी लढायची आवश्यकता नाही. माझ्याकडे सहा प्रबळ दावेदार असल्याचे त्यांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदारसंघातून तुम्ही लढणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ते म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी विजय सिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. मात्र माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही. पण या बाबत विचार करून सांगू, असे त्यांना मी सांगितले, असे त्यांनी नमूद केले.