
मासा खाल्याने सुजला चेहरा;सोनू निगम थेट रुग्णालयात दाखल
मुंबई,(सहयाद्री बुलेटीन) – प्रसिद्ध गायक सोनू निगमला मासे खाल्ल्याने अॅलर्जी झाली असून त्याचा चेहरा इतका सुजला होता की तो ओळखू येण्याच्या पलिकडे बदलला होता. यामुळे सोनूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याबाबतची माहिती सोनूने इन्स्टाग्रामवरून दिली आहे. अॅलर्जीमुळे त्याच्या एका डोळ्याला सूज आली असून श्वास घ्यायला देखील त्रास होत आहे. सोनूने आपल्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यां चाहत्यांचे आभार मानले आहेत.
'आपण माझ्या प्रकृती विषयी व्यक्त केलेल्या चिंतेबद्दल व प्रेमाबद्दल धन्यवाद,ओडीशामधील जयपोर येथून परतत असताना एक धडा मिळाला आहे. तो म्हणजे अॅलर्जीबाबत कधीच रिस्क घ्यायची नाही, मासे खाल्ल्याने मला अॅलर्जी झाली आहे. जर जवळ रुग्णालय नसते तर श्वासनलिकेला देखील सूज आली असती आणि माझी प्रकृती आणखी खालावली असती ' असे सोनूने त्याच्या इन्स्टाग्रामवर लिहिले आहे. एका कार्यक्रमानिमित्त तो जयपोर येथे गेला होता. कार्यक्रमानंतर जेवणात मासे खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडल्याचे सोनू निगमने सांगितले आहे.
मात्र सोनू निगम उगाच माशांबद्दल गैरसमज पसरवत असून, त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो असे मत कोळी महिलांनी व्यक्त केले आहे.