'केजीएफ'च्या सिक्वेलमध्ये दिसणार अभिनेता संजय दत्त
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झालेला यश स्टारर कन्नड चित्रपट केजीएप चॅप्टर 1 ने बॉक्सऑफीसवर धुवांधार कमाई केली. या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन देखील रिलीज करण्यात आले होते. फार कमी स्क्रीनवर रिलीज होऊन देखील या चित्रपटाने हिंदीमध्ये चांगली कमाई केली.
केजीएफ संदर्भात एक बातमी असून केजीएफचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिक्वेलमध्ये अभिनेता संजय दत्त दिसणार आहे. संजय दत्त या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील करत आहेत. मेकर्स यांच्यानुसार त्यांनी संजय दत्तसोबत चित्रपटासंदर्भात चर्चा केली आहे.