‘गली बॉय’ १४ फेब्रुवारीपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूडमध्ये सध्या यशाच्या शिखरावर असलेले दोन कलाकार अर्थात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षित ‘गली बॉय’ १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. पण त्यापूर्वी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमिअर पार पडला असून जगभरातील चित्रपट समीक्षकांनी कौतुक केलं आहे. तर बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी आयोजित केलेल्या प्रिमिअरनंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर या चित्रपटासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे.

Review