डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या व्याख्यानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी (सह्याद्री बुलेटीन)- आमदार लक्ष्मण जगताप युवा मंचाच्या वतीने विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंद या विषयावर डॉ.जगन्नाथ दीक्षित यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी पिंपळे सौदागर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यानाची सुरूवात करण्यात आली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक शंकर जगताप, अश्विनीताई लक्ष्मण जगताप, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, माऊली जगताप, स्थायी सभापती ममता गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते जयनाथ काटे यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती दिली. नियमित व्यायाम आणि डाएटचे कटाक्षाने पालन केल्यास गोळ्या औषधांपासून कायमस्वरूपी सुटका होवू शकते, त्यामुळे सुमारे ४ किलोमीटर चालणे आणि दिवसातून दोनच वेळेला जेवण करणे हा यशस्वी मूलमंत्र त्यांनी यावेळी दिला.