पिंपरी-पोलीस आयुक्तालयातून ८ पोलीस अधिकाऱ्यांची पुण्यात बदली

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन)- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या सात सहायक निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकाची प्रशासकीय कारणास्तव पुणे पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली. १४ फेब्रुवारी रोजी याबाबतचे आदेश दिले.

सहायक निरीक्षक नकुल सिध्दप्पा न्यामणे, अलका दामोदर सरग, गणेश जयसिंग धामणे, नीलेश दत्ता वाघमारे, जगन्नाथ महादेव बनसोडे, दिगंबर पांडुरंग सूर्यवंशी, राजू रामचंद्र ठुबल आणि उपनिरीक्षक नंदराज तुकाराम गभाले अशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात काम करीत असलेल्या या आठ अधिकाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव पुणे पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली. पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी १४ फेब्रुवारी रोजी कार्यालयीन कामकाजानंतर या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याबाबतचे आदेश दिले.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील १५० पोलिस कर्मचारी पुणे आयुक्तालयात काम करण्यास इच्छुक आहेत. तर पुणे पोलिस आयुक्तालयातून २०० कर्मचारी पिंपरी चिंचवडमध्ये काम करण्यास इच्छुक आहेत.

 

Review