वाकड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी;चोरीला गेलेले २५ लाखांचे २०१ मोबाईल केले हस्तगत

पिंपरी,(सह्याद्री बुलेटीन) – गेल्या सहा महिन्यांमध्ये वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या तसेच गहाळ झालेल्या दोनशे एक मोबाईलचा शोध लावण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून तसेच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून २५ लाखांचे मोबाईल हस्तगत केले आहेत.

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सातशेहून अधिक मोबाइल गहाळ झाले होते. पोलीस उपनिरीक्षक हरीष माने व त्यांच्या पथकाने मोबाइलचे IMEI नंबर ट्रेसिंगला लावून २०१ महागड्या मोबाइलचा शोध लावला. हे फोन विविध राज्यातून तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून हस्तगत करण्यात आले. गुरुवारी हस्तगत करण्यात आलेल्या मोबाइलचे वाटप मूळ मालकांना पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, निरीक्षक सुनील पिंजन, उपनिरीक्षक हरीष माने, कर्मचारी डी.डी. सणस, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, नितीन दोरजे, जावेद पठाण, सुरेश भोसले, रमेश गायकवाड, विक्रम जगदाळे, भैरोबा यादव, शाम बाबा, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, नितीन गेंगजे, दीपक भोसले, मधुकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, नूतन कोंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

Review